पुण्यात पुढील दोन दिवस मिरवणुकांना बंदी

महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे – शहरातील करोनाची साथ लक्षात घेऊन महापालिकेकडून पुढील दोन दिवसांत शहरात मिरवणूक, फेऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

मंगळवारी- गुढीपाडवा आणि बुधवारी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी ही नियमावली लागू आहे. हे दोन्ही सण कोणतीही गर्दी न करता तसेच नियमांचे उल्लंघन साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही वेळ घालून देण्यात आली आहे.

अशी आहे महापालिकेची नियमावली
– सण आणि उत्सव एकत्रित न येता साधे पणाने साजरे करावेत.
– गुढी पाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाइक रॅली व मिरवणुका काढू नयेत. कोणत्याही  सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊ नयेत, पाचपेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येऊ नये.
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाइक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यासाठी 5 पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येऊ नये. सोशल डिस्टन्सचे पालन करावे.
– जयंती साजरी करताना, सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाण्यांचा कार्यक्रम, नाटक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत. असे कार्यक्रम केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत.
– या दोन्ही दिवशी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिर, महापालिकेचे पूर्वनियोजित कार्यक्रम यांना प्राधान्य द्यावे. करोनासह साथरोग उपाय योजनांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.