सचिन वाझेला पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया सुरू

एटीएस आणि एनआयएकडून अहवाल मिळाला

मुंबई – अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला आता पोलीस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. सचिन वाझेविरोधात भा. दं. वि.1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर या प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती. त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याच एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र विशेष शाखेला सोपवण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेवर भा. दं. वि. 1949 च्या कलम 311 अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील.

मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की आम्हाला एटीएस आणि एनआयएकडून अहवाल मिळाला आहे, जो आम्ही आता लीगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. जर सचिन वाझेविरोधात दिलेल्या अहवालाशी सरकार सहमत असेल तर वाझेला सेवेतून काढण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.