मुंबई – ‘सविता भाभी तू इथेच थांब’ या पोस्टरची चांगलीच चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. सविता भाभी मराठी चित्रपटातील एका भूमिकेचे नाव असून त्याची जाहिरात करण्याकरिता हे पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे.
निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तर आता या चित्रपटातच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
View this post on Instagram
Ashleel Udyog Mitramandal Trailer #6March #GT #twentytwenty #daintytwenty
दरम्यान, आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने ‘अश्लील’ या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ही मागणी केली आहे. सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद सुरु असतानाच आता चित्रपटाच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी मराठी वृत्तमाध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.