‘या’ कारणामुळे ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या वाढणार अडचणी?

मुंबई – 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर 1’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, काहीदिवसांपूर्वी  या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात आले होते. ‘कुली नंबर 1’ चित्रपटात अभिनेता ‘वरून धवन’ आणि अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही धमाकेदार जोडी दिसून येणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असून, आता कुली नंबर 1 चित्रपट 25 डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनचे प्लॅन्स तयार होऊ लागले आहेत. अशात वरुण आणि सारा ही जोडी चित्रपटात असली तरी सिनेमाचं प्रमोशन सारा करणार नाहीय असं कळतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने जो तपास चालू केला त्यात सारा अली खानही होती. तिच्यावर झालेले आरोप आणि तिने एनसीबीला दिलेली उत्तरं ही लोकांना कळली. याचा परिणाम आता चित्रपटावर आणि सारा अली खानवर होणार हे नक्कीच.

 

View this post on Instagram

 

Heroine tera birthday aaya, birthday ke din main tere liye poster laya! Happy 22nd bday @saraalikhan95 cyu guys may1st2020

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

कदाचित आता कुली नंबर 1 च्या प्रमोशनसाठी साराला आणलं तर मिडिया तिला तेही प्रश्न विचारेल अशी भीती निर्मात्यांना वाटते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरून धवन एकटा येणार का? साराला देखील बरोबर आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.