वाघोली (पुणे) – पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूरपर्यंत करण्यात येत असलेल्या रस्ता रुंदीकरणाला विविध समस्यांची बाधा आली आहे. या कामातील समस्या सुटण्याऐवजी दिरंगाईसह वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे वाहनचाकांसह, परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेक महिन्यांपासून पुणे-नगर महामार्गावर वाघोली-शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हायब्रीड ऍन्यूइटी अंतर्गत वाघोली (ता. हवेली) येथे करण्यात येत आहे. शनिवारी (दि. 13 मार्च) सकाळी वाघोलीमध्ये रस्त्याच्या मधोमध युटीलिटी क्रॉसिंग पाइप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे सुमारे चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आलेली खडी वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. यामध्ये अनेक वाहने अडकून पडत आहेत. सलग काम न करता एका ठिकाणी अर्धवट काम करायचे त्यानंतर पुन्हा दुसरीकडे करायचे या प्रकारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा अनेक ठिकाणी उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अजून किती दिवस काम चालणार? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रुंदीकरणामुळे ठीक-ठिकाणी सुरू असलेल्या अर्धवट कामांमुळे वाहनधारकांसह महामार्गालगत असणाऱ्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाघोली परिसरात रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दर्जा आणि गुणवत्तेची उदाहरणे देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. गुणवत्ता सुधारली नाही व वाहतूक
कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली तर भाजप च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– गणेश कुटे, भाजप नेते, महाराष्ट्र प्रदेश
<
blockquote>पुणे-नगर मागामार्गावर रुंदीकरणाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नाही. सलग काम न करता ठीक-ठिकाणी अर्धवट काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना धोका पत्करावा लागत आहे. 13 मीटरच्या बाहेर विद्युत केबल टाकणे गरजेचे आहे. परंतु 13 मिटरच्या आतच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबलमध्ये काही दोष झाल्यास संपूर्ण रस्ता खोदावा लागणार आहे. केबल काढून 13 मीटरच्या बाहेर टाकण्यात यावे, अन्यथा संबधित ठेकेदाराचे बिल काढू नये.
-संदीप सातव, माजी उपसरपंच, वाघोली