सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आनंदश्री संस्था यांच्या वतीने Excellent Ledership Awards ने ६ राज्यातील एकूण ५० जणांना गौरवण्यात आले. प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा प्रा.दिनेश गुप्ता यांनी याचे आयोजन केलेले होते.
या मध्ये पुण्यातील झील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये व्यवस्थापन विभागात गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या प्रा.सचिन वाडेकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यबद्दल आनंदश्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यां तर्फे सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रा.सचिन वाडेकर यांचे झील एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांडवे यांनी अभिनंदन केले तर संस्थेचे सचिव जयेश काटकर यांनी शुभेच्छा दिल्या.
– राज देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग