#ProKabaddi2019 : तेलुगु टायटन्स आणि तमीळ थलाईवाज आज भिडणार

तेलुगु टायटन्स वि. तमीळ थलाईवाज
रात्री 8-30 वाजता

हैदराबाद – प्रो कबड्डी स्पर्धेत आज पहिल्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाविरूद्ध गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स असा सामना होणार आहे तर या संघांमधील लढतीनंतर दुसऱ्या सामन्यात तेलुगु टायटन्ससमोर तमीळ थलाईवाज यांचे आव्हान असणार आहे.

स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू सिद्धार्थ देसाई याला तेलुगु संघाकडून आपला अव्वल दर्जा सिद्ध करण्याची हुकमी संधी मिळणार आहे. त्याच्याबरोबरच अबोजोर मिघामी, विशाल भारद्वाज व फरहाद राहिमी यांना तमीळचे बचावरक्षक कसे रोखतात याची उत्सुकता आहे. तमीळ संघाकडून अजय ठाकूर, शब्बीर बाप्पू हे आक्रमक चढाया करण्याबाबत माहीर मानले जातात.

दरम्यान, गचीबावली स्टेडियमवर प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या मोसमास शनिवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत यु मुंबा संघाने तेलुगु टायटन्सचा 31-25 तर दुसऱ्या लढतीत गतविजेत्या बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्‌सवर 34-32 असा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)