Pro Kabaddi League 2024 (U Mumba vs Gujarat Giants) | प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 100 वा सामना अतिशय रोमांचक होता. अखेरच्या रेडमध्ये (चढाई) सामन्याचा निकाल लागला आणि गुजरात जायंट्सने यू मुंबाविरुद्ध 34-33 अशा फरकाने विजय मिळवला.
Match 100. Drama beyond 100 🤯#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #UMumba #GujaratGiants pic.twitter.com/s5SlmyvUte
— ProKabaddi (@ProKabaddi) December 8, 2024
गुजरात जायंट्ससाठी, त्यांचे दोन्ही रेडर गुमान सिंग आणि एचएस राकेश यांनी या सामन्यात सुपर 10 पूर्ण केले. डिफेंसमध्ये (बचाव) सोमबीरने हाय फाईव्ह घेतले. तर यू मुंबासाठी अजित चौहानने एकट्याने 14 गुण घेतले पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.
पहिला हाफ 16-15 अशा गुणांने गुजरात जायंट्सच्या नावे राहिला. दुसऱ्या हाफला सुरुवात होताच यू मुम्बाने गुजरात जायंट्सला ऑलआऊट केले आणि त्यामुळे ते सामन्यात आघाडीवर आले. मात्र, यानंतर गुमान सिंगच्या चमकदार कामगिरीमुळे गुजरात जायंट्सने दमदार पुनरागमन केले आणि सामना बरोबरीवर आला. यानंतर गुजरात जायंट्सने यू मुंबाला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेतली.
गुजरातसाठी बचावात नीरज आणि सोमबीर गुण मिळवत होते. सामन्याला 5 मिनिटे बाकी असताना गुजरात संघ तीन गुणांनी पुढे होता पण अजित चौहानने सुपर रेड मारत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या सेकंदापर्यंत सामना 33-33 असा बरोबरीत होता पण यू मुंबाची शेवटची रेड (चढाई) करो या मरो अशी होती आणि त्याचा फायदा गुजरात जायंट्सने घेतला आणि मंजीतला टॅकल करत गुजरातने हा सामना आपल्या नावावर केला.