Pro Kabaddi 2024 (Pune) – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामाचे हैदराबाद व नोएडा येथील दोन्ही टप्पे संपन्न झाले असून मंगळवारपासून या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला शिवछत्रपती संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे सुरुवात होणार आहे.
पहिल्या दोन टप्प्याप्रमाणेच तिसरा टप्पा देखील मनोरंजक होऊन स्पर्धा अजून तीव्र होणार असल्याचे मशाल स्पोर्टसचे प्रमुख व कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
Season 1️⃣1️⃣: Episode 3️⃣ 👉 𝐓𝐇𝐄 𝐏𝐔𝐍𝐄 𝐋𝐄𝐆❗️
Streaming 🔜 Are you ready? 😉🍿#ProKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #LetsKabaddi pic.twitter.com/5qDFkTeUTF
— ProKabaddi (@ProKabaddi) December 2, 2024
पुण्यामध्ये 3 ते 24 डिसेंबर दरम्यान स्पर्धेचा तिसरा टप्पा संपन्न होणार आहे. पुण्यातील टप्पा पूर्ण झाल्यानंतर 26 ते 28 दरम्यान बाद फेरीच्या लढती होतील. 26 व 27 डिसेंबर रोजी उपांत्य फेरी व एलिमिनेटरच्या लढती होणार आहेत. 29 डिसेंबर रोजी 11 व्या हंगामातील अव्वल दोन संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. पुणे टप्प्यातील पहिला व स्पर्धेतील 89 वा सामना रात्री 8 वाजता बेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात तर दुसरा सामना यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यामध्ये रात्री 9 वाजता सुरू होईल.
नोएडा येथील टप्प्यातील अखेरच्या दिवशी पार पडलेल्या दोन सामन्यात दबंग दिल्ली आणि पटणा पायरेट्स यांनी बाजी मारली. स्पर्धेतील 87 व्या सामन्यात दबंग दिल्लीने तमिळ थलायवाजचा 32-21 अशा फरकाने तर 88 व्या सामन्यात पटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सचा 38-35 अशा फरकाने पराभव केला.
Pro Kabaddi 2024 : दबंग दिल्लीचा थलायवाजवर विजय तर पटणा पायरेट्स बंगालवर ठरले भारी….
दरम्यान, प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 88 सामने खेळले गेले आहेत आणि हरियाणा स्टीलर्स 15 सामन्यातील 12 विजय आणि 61 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर पाटणा पायरेट्स 52 गुणांसह दुसऱ्या तर दंबग दिल्ली 48 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.