Pro Kabaddi 2024 (Gujarat Giants vs Patna Pirates) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 47 वा सामना नोएडा येथे गुजरात जायंट्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाटणा पायरेट्स संघाने शानदार विजय संपादन केला. त्यांनी गुजरात जायंट्सचा 40-27 अशा फरकाने पराभव केला.
The Pirates board the winning ship 🚢#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #PatnaPirates pic.twitter.com/fGj1GU7MuF
— ProKabaddi (@ProKabaddi) November 11, 2024
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमात गुजरात जायंट्सचा हा सलग सातवा पराभव आहे आणि त्यांना विजय कसा मिळवायचा हेच समजत नाही.या सामन्यासाठी गुजरात जायंट्सने त्यांचा कर्णधार नीरज कुमारला प्लेइंग-7 मधून वगळले होते. त्यांच्या जागी गुमान सिंगला कर्णधार बनवण्यात आले होते. तर दुसरीकडे पाटणा पायरेट्स आपल्या युवा खेळाडूंच्या जोरावर चमकदार कामगिरी करत आहे. त्यांच्यासाठी अयानने या सामन्यात चमकदार कामगिरी करत सुपर-10 गुण मिळवले.
मोसमातील पाचवा विजय नोंदवत पटना पायरेट्सने गुणतालिकेत तिस-या स्थानावर झेप घेतली. गुजरातचा या मोसमातील हा सातवा पराभव आहे. आता प्रत्येक पराभवाने गुजरातसाठी प्रकरणे बिघडत आहेत.
पूर्वार्धापूर्वी पटनाने गुजरातला ऑलआउट केलं होतं. त्यामुळे पाटणा संघ पूर्वार्धात 21-16 ने पुढे होता.त्यानंतर सामन्याच्या शेवटची 10 मिनिटे बाकी असताना गुजरातचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट झाला. यामुळे पाटणा पायरेट्सला मोठी आघाडी मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.
Pro Kabaddi 2024 : यू-मुंबाने गमावलेला सामना जिंकला, शेवटच्या क्षणी पलटवली बाजी…
पाटणासाठी डावखुरा रेडर अयानने या सामन्यात आपली जादू दाखवली आणि सुपर 10 गुण मिळवले. देवांकनेही चढाईत 6 गुण तर दीपकनं बचावात 4 गुण मिळवले. आज गुजरातकडून प्रतीक दहिया आणि गुमान सिंग अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. दोघांनी प्रत्येकी 5-5 गुण मिळवले. बचावात मोहितने एकूण 4 गुण मिळवले.