Pro Kabaddi 2024 (Haryana Steelers vs Puneri Paltan) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 79व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पुणेरी पलटण आमने-सामने होते. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सनं गतविजेत्या पुणेरी पलटणचा 38-28 असा पराभव केला. या विजयासह हरियाणा स्टीलर्सनं गुणतालिकेतील आपल अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. हरियाणाचा हा 11 वा विजय होता. हरियाणा 56 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. तर दुसरीकडे पुणेरी पलटन 42 गुणांसह सहाव्या क्रमाकांवर आहे.
स्टीलर्स ने प्वाइंट्स टेबल पर स्ट्रांग की अपनी पोजीशन 💪🔥
पुणेरी पलटन को चटाई धूल 🥵#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #PuneriPaltan pic.twitter.com/oxk4r8xfJN
— ProKabaddi (@ProKabaddi) November 27, 2024
हरियाणा स्टीलर्ससाठी, त्यांचा युवा रेडर शिवम पटारे याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने 13 गुण घेतले तर मोहम्मदरेझा शाडलूनेही चमकदार कामगिरी करत 5 गुण घेतले. हरियाणासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा प्रत्येक खेळाडू गुण मिळवत होता. रेडर्स असो वा डिफेंडर, प्रत्येक जण एकजुटीने खेळत होता.
Pro Kabaddi 2024 : युवा रेडर मसानामुत्थूची चमकदार कामगिरी, तमिळ थलैवाजचा यूपी योद्धावर सहज विजय…
पुणेरी पलटणसाठी पंकज मोहितेने सुपर 10 पूर्ण केले तर आकाश शिंदेने 6 गुण घेतले पण संघाचा बचाव फारच खराब होता. याच कारणामुळे पुणेरी पलटणला पराभवाचा सामना करावा लागला. गौरव खत्री, अबिनेश नादराजन आणि संकेत सावंत यांसारखे खेळाडू बचावात खराब फ्लॉप ठरले.