Pro Kabaddi 2024 (Dabang Delhi KC vs Puneri Paltan) : – प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण यांच्यात खेळला गेलेला 50 वा सामना 38-38 असा बरोबरीत सुटला. पुणेरी पलटण एका क्षणी सामन्यात खूप पुढे होता पण आशु मलिकच्या सुपर रेडने संपूर्ण सामन्याचे चित्र फिरवले.
This game had us on the edge of our seats 🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #DabangDelhiKC #PuneriPaltan pic.twitter.com/yUvXYFo2wu
— ProKabaddi (@ProKabaddi) November 12, 2024
आशु मलिकने शानदार खेळ करत 17 गुण मिळवले. या मोसमात 100 रेड पॉइंट पूर्ण करणारा तो पहिला रेडर ठरला. त्याच्याशिवाय मोहितने 6 आणि योगेश दहियाने बचावात 4 गुण घेतले. दुसरीकडे पुणेरी पलटणसाठी आकाश शिंदेने सर्वाधिक 8 गुण आणि बचावात अमनने 6 गुण मिळवले.
पूर्वार्धात स्कोअर 21-13 असा पुणेरी पलटणच्या बाजूने होता. त्यांनी दोनदा सुपर टॅकल करून ऑलआऊट होण्यापासून स्वत:ला वाचवले. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच दबंग दिल्लीने पुणेरी पलटणला ऑलआऊट केले. त्यामुळे केवळ 4 गुणांचे अंतर राहिले. मात्र, पुणेरी पलटणने पलटवार करत दबंग दिल्लीला ऑल आऊट करत 11 गुणांची आघाडी घेतली.
यानंतर सामन्याला 5 मिनिटे बाकी असताना आशू मलिकने सुपर रेडर करत पुणेरी पलटणला ऑलआऊट केले. त्याने एकाच चढाईत पाच गुण घेत दिल्लीचे पुनरागमन केले. त्यामुळे अखेर सामना बरोबरीत आणण्यात संघाला यश आले.