नवी दिल्ली – प्रो हॉकी लीग या मानाच्या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी महासंघाने मंगळवारी भारताचा 24 खेळाडूंचा महिला हॉकी संघ घोषित केला. या संघात महाराष्ट्रातील फलटणच्या अक्षता ढोबळे हिला प्रथमच संघात स्थान देण्यात आले आहे.
ही स्पर्धा बेल्जियम व नेदरलॅंड येथे होणार असून, यासाठी अनुभवी सविता पुनिया हिच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळेच अक्षताची संघात निवड झाली आहे.
भारतीय संघ 11 व 12 जून रोजी बेल्जियमशी 2, तर 18 व 19 जून रोजी अर्जेंटिनाशी आणि 21 व 22 जून रोजी अमेरिकेविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघ ः सविता पुनिया (कर्णधार), बिचू देवी खरीबाम, दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, अक्षता ढोबळे, निशा, सुशीला चानू पुखरामबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सोनिका, सलिमा टेटे, बलजीत कौर, वंदना कटारिया, लालरेम्सियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी, दीपिका, रानी.