बारामती, (प्रतिनिधी) – सावळ येथील ज्ञानसागर गुरुकूल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आंतरशालेय संतवाणी संगीत स्पर्धा, शासकीय मंथन परीक्षा, शालेय निवडणूक निकाल व शालेय मंत्रिमंडळ पदग्रहण समारंभ व राष्ट्रीय छात्र सेना रँक वाटप या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, मनोहर गावडे, ज्ञानसागर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर आटोळे उपस्थित होते.
शालेय निवडणुकीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सीबीएसई बोर्डमधून सार्थक पानसरे तर विद्यार्थिनी प्रतिनिधीमधून श्रेया जठार, एसएससी बोर्ड स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी तुषार दराडे व विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वरा टकले व इतर विविध खात्यांच्या मंत्रीपदी निवड झालेल्या सर्वांचा सन्मान व पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. याचबरोबर शासकीय मंथन परीक्षेत यश मिळवणाऱ्या तसेच आंतरशालेय संतवाणी संगीत स्पर्धेतील विजेत्या गुणवंत विद्यार्थी संघाचा सन्मान करण्यात आला.
कलाशिक्षक श्रीराम सावंत यांनी सूत्रसंचालन व मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक सुधीर सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सागर आटोळे, संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दीपक सांगळे,
दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे,विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, मुख्याध्यापक सुधीर सोनवणे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलीमा देवकाते, नीलम जगताप, राधा नाळे,रिनाज मिस, संगीत शिक्षक कन्हैया पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.