निकच्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाचा स्पेशल व्हिडिओ

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. निक जोनासचा वाढदिवस असल्याने प्रियंकाने त्याला खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियंकाच्या वाढदिवसाला निकने मियामी येथे खास केकसह तिला सरप्राईज दिले होते. तर, प्रियंकाने सोशल मीडियात निकसाठी एक खास व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंकाने निकसाठी शेअर केलेल्या व्हिडिओत दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की निक आपल्या चाहत्यांच्या गर्दीतून निघताना दिसत आहे. प्रियंका आणि निक यांचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ दोघांच्याही चाहत्यांना खूपच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने लिहिलं, तु माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येकक्षण खूपच खास आहे. तु जगातील प्रत्येक आनंदीक्षणासाठी पात्र आहेस. तू माझा झाल्यास त्याबद्दल आभार, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आय लव्ह यू. प्रियंकाने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून निक जोनास याने सुद्धा त्यावर कमेंट केली आहे. निक जोनासने कमेंट करताना लव्हचे इमोजी पोस्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.