बॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने लॉस अँजेलिस येथे आपला पती निक जोनाससोबत नवीन घरात दिवाळी सेलिब्रेट केली. याप्रसंगी प्रियांकाने लक्ष्मी पूजनदेखील केले. या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो प्रियांकाने आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हा फोटो शेअर करत प्रियांकाने पोस्ट केली की, लिली सिंह एक आदर्श होस्ट आणि मैत्रिण कशामुळे बनते? ती एक फेलो पंजाबी आहे. यंदाच्या दिवाळी उत्सवाचा शेवट खूपच शानदार ठरला. अशा छान सोहळयासाठी लिली तुझे आभार.” सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या दिवाळी पार्टीचे फोटो सर्वाधिक व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
या फोटोत प्रियांका ही रेट्रो लुकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट अंदाजात दिसत आहे. या दिवाळी पार्टीत प्रियांकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासा मुखर्जीच्या थ्री पीस ऍथनिक सूटमधील रेट्रो लुकमध्ये दिसत आहे.
या लुकमध्ये तिने शॉर्ट कुर्त्यासोबतच फ्लेयर्ड पॅट आणि मॅचिंग ओढणीदेखील कॅरी केली आहे. प्रियांकाने हलका मेकअप आणि मोकळे केस सोडत हा जबरदस्त लुक पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे तिने सुटसह सनग्लासेसदेखील घातलेला आहे. या लुकमध्ये प्रियांका खूपच स्टनिंग दिसत आहे.