मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे माध्यमांच्या चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून , ती नेहमीच आपले फोटो फॅन्स बरोबर शेअर करते. मात्र, या फोटोंमध्ये तिच्या बोल्ड अँड हॉट फोटोला फॅन्स मोठी पसंती देतात. प्रियांकाचा बोल्ड लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते तुफान लाईक्स आणि कमेंट करतात.
View this post on Instagram
दरम्यान, पुन्हा एकदा प्रियांका ने सोशलवर असाच एक फोटो पोस्ट केला असून सध्या तिचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. शेअर केल्या या फोटोमध्ये प्रियांका आपला लाडका कुत्रा “डीयाना’ सोबत दिसून येत आहे. यात प्रियांका आणि डीयाना या दोघांनी एक सारख्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. प्रियांकाला मुक्या प्राण्यांची खूप आवड आहे. डीयाना आणि प्रियांका या फोटो मध्ये अतिशय सुंदर दिसत असून, तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतंच प्रियांका आणि अभिनेता राज कुमार राव यांचा ‘ द व्हाईट टायगर’ हा नवा कोरा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. द व्हाईट टायगर’ या चित्रपटाला सिनेरसिकांकडून समिश्र प्रतिसाद मिळाला आहेत.
View this post on Instagram