प्रियंका यांची नौका दिशाहीन-भाजप 

नवी दिल्ली  –कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांची नौका दिशाहीन असल्याच्या शब्दांत भाजपने त्यांच्या गंगा यात्रेची खिल्ली उडवली. कुठलाही जनाधार नसलेल्या पक्षाला घेऊन ती नौका किती दूर जाईल ते कुणालाच सांगता येणार नाही, असे भाजपने म्हटले आहे.

प्रियंका यांनी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी नौकेतून प्रवास करण्याचा अनोखा फंडा वापरला आहे. त्यावर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसला वाचवण्यासाठी प्रियंका यांना राजकारणात आणण्यात आले. त्यातून त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व अयशस्वी ठरल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

नेतृत्वासाठी कॉंग्रेस पक्ष एका कुटूंबापलिकडे पाहू शकत नाही हेही सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरूनही त्यांनी कॉंग्रेस आणि प्रियंका यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे स्वत:च्या घरातील चोर पाहू शकत नाहीत; ते आता प्रामाणिकपणाचे ढोल वाजवत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. भाजपचे नेते आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही प्रियंका आणि गांधी कुटूंबावर टीकास्त्र सोडले. गांधी कुटूंबासाठी प्रत्येक निवडणूक म्हणजे पिकनिक असते. निवडणुका झाल्यावर त्या कुटूंबाचे सदस्य स्वित्झर्लंड किंवा इटलीला जातात, असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)