बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या जोडीला फॅन्सची खूप पसंती मिळाली आहे त्यांच्या लग्नसोहळ्याला देखील चाहत्यांनी मोठी गर्दीही केली होती. मात्र प्रियांका चोप्रा आणि निक यांच्यातील वयाचं अंतर कायमचं चर्चेचा विषय ठरला आहे.प्रियांकानी आपल्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या निक जोनास याच्याशी लग्न केलं आहे. यामुळे प्रियांका कायम ट्रोल होत राहिली. आजपर्यंत प्रियांकाने या चर्चांना उत्तर दिलं नव्हतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वयाच्या अंतरावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वयाच्या अंतरावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.‘पुरुष साथीदार वयाने मोठा असेल तर ते लोकांना चालतं. पण स्त्री वयाने मोठी असेल तर प्रश्न उपस्थित केले जातात. या विचारांना तिने चुकीचे ठरविले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड, हॉलिवूड आणि फिल्म प्रॉडक्शनच्या कामात प्रचंड व्यस्त असलेल्या प्रियांकाला आता राजकारणात रस निर्माण झाला आहे.आपल्याला एक दिवस देशाचे पंतप्रधानपद बनायची महत्वाकांक्षा तिने बोलून दाखवली होती.