हॉलीवूडमध्ये ऍक्‍शन रोल करणार प्रियांका

प्रियांका हॉलीवूडमध्ये आता चांगली स्थिरावली आहे. आता तर ती हॉलीवूडमध्ये चक्क ऍक्‍शन रोल देखील करणार आहे. बॉलीवूडमध्ये “स्काय इज पिंक’नंतर तिच्याकडे नवीन कोणताही प्रोजेक्‍ट आला नाही. कारण तिच्याकडे हॉलीवूडचा बिग बजेट सिनेमा येणार असल्याने तिने नवीन सिनेमा स्वीकारलाच नव्हता.

रॉबर्ट रॉड्रिग्जबरोबरच्या “वुई कॅन बी हिरोज’मध्ये ती ऍक्‍शन रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा विषय सुपर हिरोंवर आधारलेला आहे. यामध्ये एलियन्सदेखील बघायला मिळणार आहेत. परग्रहावरून आलेले हे एलियन्स पृथ्वीवरच्या सुपरहिरोंचे अपहरण करतात.

तर पृथ्वीवरील सुपरहिरो या एलियन्सना पळवून लावण्याच्या कामगिरीवर असतात. यामध्ये प्रियांका मिस ग्रॅंडेको नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अलीकडेच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या फुलांचा फोटो शेअर केला.

लंडनमध्ये वसंत ऋतूचे आगमन होत असताना ही फुले बहरतात, असे प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याबरोबर पांढऱ्या ड्रेसमधील स्वतःचाही एक फोटो तिने शेअर केला आहे. वसंत ऋतू आल्यावर आपल्यालाही फुलांसारखेच बहरल्यासारखे वाटत असल्याचे तिने म्हटले आहे. तिला फुलांबद्दल किती प्रेम आहे, हे तिने यापूर्वीही काही पोस्टमधून दाखवून दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.