निक जोन्सच्या आठवणीत प्रियांका झाली व्याकुळ; म्हणाली…”काश तुम यहां होते’

जगभरात “व्हॅलेंटाइन डे’ धूमधडाक्‍यात साजरी करण्यात आला. या खास दिनी सर्वसामान्यांपासून बॉलीवूड सेलेब्सही रोमांटिक असल्याचे दिसून आले. यादिनी देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने शुभेच्छा देण्यासाठी सुमारे 100 गुलाब पाठविले होते.

ही गुलाबाची फुले पाहून प्रियांका खूपच आनंदी झाली होती, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर दु:ख दाटून आले. वास्तविक, निक सध्या लंडनमध्ये आपल्या पत्नीपासून दूर आहे आणि “व्हॅलेंटाईन डे’ला खास बनवण्यासाठी आणि प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी त्याने असे केले होते. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

यात ती निकने पाठविलेल्या गुलाबांच्या फुलांसह सोफ्यावर बसलेली दिसत आहे. या फोटासह प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काश तुम यहां होते निक… इन फूलों की तरह.’ यासोबत आणखी एक फोटो प्रियांकाने शेअर केला. यात ती निकसोबत रोमॅंटिक पोज देताना दिसत आहे. यावर तिने लिहिले की, माझा प्रत्येकवेळचा व्हॅलेंटाइन. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’

दरम्यान, प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले होते. यानंतर ती अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. सध्या ती काही हॉलीवूड प्रोजेक्‍टवर काम करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.