सध्या भारतात करोना रुग्ण आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे प्रियांकाला ट्रोल केलं जात आहे. “भारत मरत आहे आणि तू फोटो पोस्ट करत आहेस’ असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रियांकाला धारेवर धरले आहे.
View this post on Instagram
मागे प्रियांकाने एक व्हिडिओ पोस्ट करत भारतातील करोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता बोल्ड फोटो पोस्ट केले आहे. त्यामुळे प्रियांकाला भारतातील करोना स्थितीबाबत खरोखरच काहीतरी घेणंदेणं आहे का, असा प्रश्न पडतो.
View this post on Instagram
या फोटोमध्ये प्रियांकाने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोत तिचा लूक बोल्ड आहे. या फोटोमध्ये ती सुंदर दिसत असली तरी असे फोटो पोस्ट करण्याची ही योग्य वेळ आहे का, याचा विचार प्रियांकाने करायला हवा.
View this post on Instagram