प्रियांका फरहानला टॉर्चर करायची?

चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना चित्रिकरणादरम्यान अनेक अनुभव येत असतात. बहुतेकदा नव्या कलाकारांसोबत काम करावे लागते. त्यांच्या सवयी, आवडीनिवडी, सादरीकरणाच्या पद्धती, शिस्त आदींविषयी फारसे माहीत नसते. त्यामुळे परस्परांना जुळवून घेत पुढे जावे लागते. यादरम्यान काहींची केमिस्ट्री जुळते, तर काही जण केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्या सहकलाकाराकडे पाहात असतात. पण या सगळ्यादरम्यानही कलाकार मंडळी सेटवर बरीच धम्माल करत असतात. फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांनीही “द स्काय इज पिंक’च्या सेटवर अशीच धमाल केली.

प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने फरहान आणि प्रियांका ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रियांकासोबत काम करायचा अनुभव कसा होता, असे नुकतेच फरहान अख्तरला विचारले असता तो म्हणतो की, प्रियांका मला सेटवर खूप त्रास द्यायची! आता हे वाचून भुवया उंचावू नका! कारण फरहाननेही टिप्पणी मिश्‍किलीने केली आहे.

याबाबत पुढे तो सांगतो की, प्रियांकासोबत मी भरपूर गप्पा मारल्या. माझं आयुष्य, माझं खानपान आणि खासगी जीवनातील अनेक गोष्टींबाबत आम्ही मनमोळेपणाने बोललो. आम्ही यापूर्वीही एकत्र काम केलेले असल्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर एकत्र येऊनही आम्हाला पती-पत्नीची भूमिका करताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत.’

 

View this post on Instagram

 

Can’t wait to hear your thoughts and comments on our film. ?? #3DaysToGo #TheSkyIsPink

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

फरहान सांगतो की, प्रियांकाला सामोसे प्रचंड आवडतात आणि ती सारखी खाण्यासाठी सामोशांचीच मागणी करत असते. मात्र फरहान त्यावेळी डाएटवर होता. हे लक्षात घेऊन प्रियांका त्याला सामोसे आणि वेगवेगळे चमचमीत, चटकदार पदार्थ खाऊन चिडवायची. “द स्काय इज पिंक’ हा चित्रपट 11 ऑक्‍टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.