सध्याच्या करोना काळात नुकताच बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल केले होते. आता पुन्हा प्रियांका नव्या वादात सापडली आहे.
प्रियांकाने निक सोबतचा तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिने घातलेल्या जॅकेटवर काली देवीचे चित्र दिसते.
View this post on Instagram
त्यामुळे प्रियांकाला ट्रोल केले जात आहे. जोनस बदर्स यांच्या सकर फॉर यू या गाण्यातील चित्रीकरणादरम्यानचा फोटो होता. या चित्रात हे जोडपं एकमेकांचा हात पकडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हा फोटो त्यांची गोड केमिस्ट्री दाखवत असला तरी लोकांच्या नजरा प्रियांकाच्या जॅकेटवरच राहिल्या आहेत. लोकांच्या ते पसंतीस पडले नाही. कित्येकदा ती तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा शिकार होते. प्रियांका पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे.