दिल्ली गोळीबारवरून प्रियांकांचा मोदी सरकारला खोचक प्रश्न

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का) सुरू असणाऱ्या निदर्शनातील निदर्शकांवर हल्ला करणाऱ्या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव रामभक्त गोपाल शर्मा असे आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

प्रियांका गांधी ट्विट केले आहे की,’भाजप सरकारचे मंत्री आणि नेते लोकांना गोळ्या घालवण्यासाठी प्रवृत्त करतील तसंच भडकाऊ भाषण करतील तर असे होणे शक्य आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रकारची दिल्ली बनवायची आहे याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन प्रश्न विचारले आहेत. ते हिंसेसोबत उभे आहेत का अहिंसे सोबत उभे आहेत? आणि ते विकासासोबत उभे आहेत की अराजकतेसोबत उभे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.