अमेरिकेत भारतीय खाद्यांना मिस करतेय प्रियांका

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. निक जोनास याच्यासोबत लग्न केल्यानंतर प्रियांका अमेरिकेत राहत आहे.


परंतु तेथे प्रियांका चोप्रा भारतीय खाद्यांना खूपच मिस करत आहे. प्रियांका चोप्रा म्हणते, मला घरात बनविलेले भारतीय पदार्थ खूपच आवडतात आणि अमेरिकेत मला डाळ-भात खाण्याची खूप इच्छा होते. पण अमेरिकेत हे अन्न सहज उपलब्ध होत नाही.

आपल्या आवडत्या भारतीय जेवणाबद्‌दल प्रियांका म्हणाली, मला अनेक भारतीय खाद्य पदार्थ आवडतात. विशेषतः घरात बनविलेले जेवण मला आवडते. मग ते डाळ-भात असले तरी मी आवडीने खाते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास प्रियांका चोप्रा नुकतीच “द व्हाइट टायगर’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामिन बहारानी यांनी केले होते. यात राजकुमार राव, महेश मांजरेकर आणि विजय मौर्य यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी प्रियांकाला गोल्ड बेस्ट अवार्डसमध्ये “बेस्ट ऍक्‍ट्रस’साठी नॉमिनेशन मिळाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.