मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता निक जोनास यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. सततच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रियांका आणि निक आपल्या खासगी आयुष्यातील अपडेड नेहमीच आपल्या फॅन्सना देत असतात.
View this post on Instagram
प्रियांका आणि निकने त्यांच्या रिलेशनशिप बाबत नेहमीच भावुक पोस्ट करत असतात इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोला फॅन्स तसेच बॉलिवूड सेलेब्सकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. तर काही फॅन्स त्यांना त्यांचा वयातील अंतरामुळे ट्रोल करत असतात. मात्र याबाबत पहिल्यांदाच प्रियांकाने तिच्या आणि निकमध्ये असलेल्या वयातील अंतरावर मौन सोडले आहे.
View this post on Instagram
निकपेक्षा जवळपास 10 वर्ष मोठी असून कायमच त्यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता लग्नानंतर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिल्यामुळे पुन्हा एकदा सोशलवर चर्चेला उधाण आले आहे.
View this post on Instagram
वृत्तमाध्यमांशी आपल्या रिलेशनशिप बाबत बोलतांना ती म्हणाली ,’नात्यात एकमेकांमध्ये फरक किंवा साम्य शोधण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं किंवा आवडीनिवडी जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. ” असं म्हणत तिने या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या दोघांनी पहिले सीक्रेड वेडिंग केले होते. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका आणि निक जोनासचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.