लॉकडाऊडाउनमध्ये ‘ही’ चिमुकली करतेय प्रियांकाचा मेकअप

यावर्षी करोना महामारीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि सोहळे रद्द झाले आहेत. मेट गाला इव्हेंटही यापैकीच एक आहे. करोनाचा महाप्रसार झाला नसता तर 4 मे रोजी हा इव्हेंट सुरू झाला असता.


मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा अनेकदा झळकली आहे. यावेळी प्रियांका हा इव्हेंट घरबसल्या होस्ट करत आहे. अलीकडेच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर आपली भाची स्काय कृष्णासोबत काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रामध्ये ही लहान परी प्रियांका चोप्राची तयारी करताना दिसत आहे. तिने क्राऊन परिधान केला आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये कृष्णा प्रियांकाचा आय मेकअप करत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये ती प्रियांकाला लिपस्टिक आणि आयलायनर लावताना दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांका खूप हसताना दिसत आहे. या फोटोंखाली प्रियांका लिहिते की, मे महिन्यातील पहिला सोमवार. या वर्षाची थीम आहे – प्रीटी प्रीटी प्रिन्सेस ! प्रियांकाची ही छायाचित्रे चाहत्यांना मनापासून आवडली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.