प्रियांका चोप्राला देशाबरोबर विदेशातूनही खूप चांगल्या असाईन्मेंट मिळत असतात. अलिकडेच तिला ब्रिटीश फॅशन कौन्सिलकडून “पॉझिटिव्ह चेंज’ या विषयासाठी ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निवडीची माहिती स्वतः प्रियांकाने ट्विटरवरून दिली आहे.
View this post on Instagram
तिने आनंद व्यक्त तर केला आहेच. त्याबरोबर ही नवीन जबाबदारी किती महत्वाची आहे, हे देखील तिने सांगितले आहे. आणखी एक वर्षासाठी ती लंडनमध्येच राहून या नवीन जबाबदारीची धुरा सांभाळणार आहे. “फॅशन नेहमीच पॉप कल्चरचा भाग राहिला आहे.
View this post on Instagram
लोकांमधील बदलत्या संस्कृतीचा आरसा म्हणजे फॅशन असते.लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र सांधण्यासाठी फॅशनमधील सकारात्मक बदल हेरणे आणि त्याची खासियत् लोकांपुढे मांडणे.’ हे तिचे काम असणार आहे. प्रियांकाने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये या फॅशनमधील वैविध्यतेला जपले आहे आणि लोकांमधील विधायक सक्रियतेलाही प्रोत्साहन दिले आहे.
View this post on Instagram
यापूर्वी प्रियांकाला संयुक्त राष्ट्राची गुडविल ऍम्बेसिडर म्हणूनही निवडले गेले होते. हिंदी चित्रपटांमधील अभिनयाबरोबर तिने हॉलिवूडमध्येही आपला जम बसव्ला आहे. तसेच अन्य प्रादेशिक भारतीय भाषांमधील चित्रपटांची निर्मितीही तिने केली आहे.
View this post on Instagram