महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे-साळुंखे यांचा भव्य सत्कार

पुणे : राजेसाळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान आणि शिवजयंती महोत्सव समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे-साळुंखे यांचा जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी प्रियांकाला ज्यांनी घडवलं ते म्हणजे त्यांचे आई वडील दोघेही उपस्थित होते.
नुकताच पार पडलेला खो-खो वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारताने नेपाळवर ७८-४० अशी दणदणीत मात करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या संघाचे नेतृत्व प्रियांका यांनी केले होते. त्याचबरोबर भारतीय पुरुष खो-खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर, खो खोला साता समुद्रापार नेणारे डॉ. चंद्रजित जाधव ,प्रशिक्षक प्राची वाईकर या मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. राजवंशातील इंगळे घराण्याची ही सुपुत्री आज संपूर्ण समाजाच्या अभिमान असल्याचे म्हणत मान्यवरांनी कौतुक केले. दरम्यान , या कार्यक्रमा
ला शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड हे अध्यक्ष म्हणून लाभले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र स्पोर्ट फॉर ऑलम्पिकचे सचिव राजेंद्र घुले, श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे सचिव
प्रवीण गायकवाड , रिंकल अमित गायकवाड. शिक्षण आघाडी, भाजपा पुणेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे,महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे कर्नल प्रमोद दहितुले ,सिद्धिविनायक रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र डिंबळे ,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे चेअरमन सचिन गोडबोले ,सामाजिक कार्यकर्ते माऊली जरांगे, आणि पुनगावकर दाम्पत्याची उपस्थिती लाभली.
शिवाजी अप्पा साळुंखे यांच्या पुढाकाराने राजेसाळुंखे चालुक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. शरदसाळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात जवाहर साळुंखे, संदेश ताकवले, शेखर साळुंखे, सुरेंद्र इंगळे सरकार, जितेंद्र साळुंखे, रवींद्रदादा लिंभोरे, प्रकाश साळुंखे, शरद साळुंखे, संदीप वाघचौरे, वैभव साळुंखे, सागर साळुंखे अथर्व साळुंखे, स्वप्निल साळुंखे, साळुंखे बंधू, रांजणे, वकील घनवट आणि अवधूत साळुंखे हेदेखील यावेळी उपस्थित होते.





