जयपूर – उत्तरप्रदेश आणि अन्य ठिकाणच्या निवडणूक प्रचारात जोरदार कामगिरी बजावणाऱ्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या निवडणूक निकालानंतरच्या संभाव्य स्थितीवर चर्चा करण्यासाठी तसेच पक्षाची रणनिती निश्चीत करण्यासाठी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांची भेट घेण्याच्या उद्देशाने जयपुर दौऱ्यावर आल्या आहेत.
कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्या समवेत प्रियंका आज जयपुरला आल्या त्यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद दोस्तरा हे उपस्थित होते.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की 10 मार्चला पाच राज्यांतील निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्या संबंधात गेहलोत यांच्याबरोबर चर्चा करून त्या रणनिती निश्चीत करतील. त्यांना उत्तरप्रदेशच्या संबंधात विषेश मार्गदर्शन यावेळी अपेक्षित आहे असेही सांगण्यात येते.
गहलोत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते तर आहेतच पण ते एक उत्तम राजकीय रणनितीकारही मानले जात असल्याने प्रियंकांनी त्यांच्याशी चर्चा करण्यास प्राधान्य दिले आहे.