मुंबई – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या महामारीच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी मदतीसाठी एक हात पुढे केला आहे. अशात अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील देशाच्या मदतीसाठी धावून आली असून तिने मदतीचे आवाहन केल्यानंतर 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी मिळून 10 लाख डॉलरची मदत केली आहे. प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची महिती जाहीर केली आहे.
View this post on Instagram
प्रियंकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने जगाचा नकाशा आणि ज्या देशांनी भारताला मदत केली आहे ते देश दाखवले आहेत. व्हिडिओ पोस्ट करत प्रियंका म्हणाली, ‘आपल्या इतिहासात सर्वात काळ्या दिवसांत, माणुसकीने साध्य केलं आहे, की एकजुटीने सर्व काही शक्य आहे. तुम्ही केलेल्या मदतीमुळे मी आणि निक आनंदी आहोत.’
पुढे प्रियंका म्हणते, ’14 हजारपेक्षा जास्त लोकांनी या कठीण काळात 10 लाख डॉलर जमा करण्यासाठी मदत केली आहे. मिळालेली सर्व मदत ऑक्सीजन कंसंट्रेटर, वॅक्सीन आणि अन्य गरजेच्या वस्तूंसाठी वापरण्यात येत आहेत.’ शिवाय या माहमारीवर मात करण्यासाठी 30 लाख डॉलर जमा करण्यासाठी प्रियंका आणि निक प्रयत्न करत आहेत.