पीयुष गोयल यांच्यावर भडकल्या प्रियांका

तुमचे काम अर्थकारण सुधारण्याचे, कॉमेडी सर्कस बंद करा

नवी दिल्ली – रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी नोबेल पुरस्कार विजते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यावर ते डाव्या विचाराचे असल्याचा आक्षेप घेत त्यांच्यावर असल्याची टीका केली होती. या टीकेवरून कॉंग्रस नेत्या प्रियांका गांधी मात्र चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी पीयुष गोयल यांना उद्देशून म्हटले आहे की मंत्री म्हणून तुमचे काम अर्थव्यवस्था सुधारण्याचे आहे. असली कॉमेडी सर्कस आता तुम्ही बंद करा.

काल पुण्यात बोलताना पीयुष गोयल यांनी म्हटले होते की कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील न्याय योजनेची संकल्पना अभिजीत बॅनर्जी यांनी मांडली होती. पण त्यांची ही योजना लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान करून फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक संकल्पनांचा विचार करण्याची गरज नाही. तसेही बॅनर्जी हे डाव्या विचारांचे अर्थतज्ज्ञ असल्याची टीकाही गोयल यांनी केली होंती.

त्यावर प्रियांकांनी म्हटले आहे की भाजपचे लोक स्वताचे काम करायचे सोडून दुसऱ्याच्या कर्तबगारीला कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाची खालावत जाणारी अर्थव्यवस्था सुधारायचे काम त्यांनी करावे आणि असली कॉमेडी सर्कस त्यांनी बंद करावी अशी सुचनाहीं प्रियांकांनी त्यांना ट्‌विटरवर केली आहे. या ट्‌विटरला जोडूनच त्यांनी मंदीच्या संबंधातील बातम्यांची कात्रणेही जोडली आहेत.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळतो आणि मोदींचे आर्थिक सल्लागार मात्र त्यांना मध्येच सोडून जात आहेत अशी टीकाही गेले काही दिवस कॉंग्रेस समर्थकांकडून केली जात आहे. त्यामुळे नोबेल पुरस्कार विजेते बॅनर्जी भाजपच्या रडारवर आले असावेत असे सांगितले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.