प्रियंका गांधींचा युपीचा दौरा चौथ्यांदा रद्द

लखनऊ – लोकसभा निवडणूक जवळ आली असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांचा तीन दिवसीय वाराणसीचा दौरा चौथ्यांदा रद्द करण्यात आला आहे. यामागील करणे अद्याप स्पष्ट करण्यात आली नसून प्रियंका गांधी-वढेरांच्या कार्यक्रमाची रूपरेषा अद्याप ठरलेली नसल्याचे युपीचे काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी-वढेरा यांची पहिलीवहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातेत झाली. यावेळी बोलताना प्रियंका गांधी-वढेरा यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here