भाजपाच्या ‘मे भी चौकीदार’ अभियानावर प्रियांका गांधींचा पलटवार 

नरेंद्र मोदींनी हवे ते आपल्या नावासमोर नाव लावावे, असे म्हणत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उत्तरप्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर आज सडेतोड टीका केली.

काँग्रेसने राफेल विमानाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना सातत्याने घेरत ‘चौकीदार चोर आहे’ अशी टीका केल्याने याच टीकेला आपले प्रभावी हत्यार बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोशल माध्यमांवर आपले नाव बदलत नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्दप्रयोग केला आहे. तसेच सोशल माध्यमांवर भाजपाने ‘मे भी चौकीदार’ अभियान राबवले आहे. त्यामुळे भाजपाच्या ‘मे भी चौकीदार’ अभियानावर प्रियांका गांधी वढेरा यांनी टीका करत “त्यांनी आपल्या नावासमोर हवे ते लावावे, असे म्हणत श्रीमंत लोकच चौकीदार ठेवतात. मला तर एका शेतकऱ्याने सांगितले श्रीमंतांचे चौकीदार असतात तर गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे चौकीदार ते स्वतःच असतात”, असे त्या म्हणाल्या.

प्रियांका गांधी वढेरा या सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी दौऱ्यावर आहेत. वाराणसी हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असून आपल्या शैलीत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या देशाच्या सुरक्षेसाठी मी घरातून बाहेर पडली आहे. या सरकारमुळे संविधानाला धोका निर्माण झाला असून देश वाचविण्यासाठी आपल्या सर्वांनाच घरातून बाहेर पडावे लागेल असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)