मुंबई – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राम मंदिर भूमिपूजनाबाबत जाहीर केलेली भूमिका बाबरी मशिदीच्या पतनाला अघोषित पाठिंबा असल्याचे गंभीर वक्तव्य पक्षाचे माजी राज्यसभा खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केलं आहे. मुणगेकर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून याबाबतची भूमिका मांडली.
Smt. @priyankagandhi’s statement about laying down stone of the Ram Mandir at Ayodhya is a tacit approval of the demolition of Babri Masjid. (1/2) #RamMandir
— Dr Bhalchandra Mungekar (@DrMungekar) August 5, 2020
ते म्हणतात, “प्रियंका गांधी यांचे राम मंदिर भूमिपूजनाबाबतचे वक्तव्य बाबरी मशिद पतनाला अघोषित पाठिंबा आहे. सॉफ्ट (सौम्य) हिंदुत्वाचा स्वीकार काँग्रेसचे राजकीय महत्व कमी करणारा ठरेल. अपेक्षा करतो की, भाजपचे राम मंदिर उभारण्याचे उद्दिष्टय पूर्ण झाल्यानंतर तरी ते विभाजनवादी हिंदुत्वाचा अजेंडा सोडून देतील.”
This approach of soft Hindutva would make @INCIndia politically irrelevant. Hope, after its main mission is fulfilled. the BJP would give up its divisive Hindutva agenda from today. (2/2) #RamMandir
— Dr Bhalchandra Mungekar (@DrMungekar) August 5, 2020
काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?
राम मंदिर भूमिपूजनाबाबत प्रियंका गांधी यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वातून भारताला आणि भारतीय उपखंडाला कायमच बंधुत्व व एकतेचा संदेश मिळाला आहे. जगाच्या नागरीकरणावर रामायणाची अमिट छाप आहे. प्रभू रामचंद्र हे कायम भारत आणि भारतीय उपखंडासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. प्रभू रामचंद्र हे सर्वांचेच आहेत. त्यांनी सर्वांच्याच कल्याणाची कामना केली आहे. म्हणूनच त्यांचा उल्लेख मर्यादा पुरुषोत्तम असा केला गेला आहे.”