लखनौ – उत्तरप्रदेशात आम्ही शक्य तितक्या क्षमतेने लढाई लढलो आहोत आम्ही आमचे सारे कसोशिचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे आम्ही निकालाची प्रतीक्षा करू आणि प्रत्यक्ष निकाल पाहू अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक्झिट पोलच्या निकालावर व्यक्त केली आहे.
प्रियंका गांधी आज लखनौ, मध्ये महिला दिनानिमीत्त कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली.
त्या म्हणाल्या की आम्ही या निवडणूकीत 159 महिला उमेदवारांना तिकीटे, दिली होती. त्यांच्या समवेत आम्ही महिला दिन साजरा करीत आहोत असे त्या म्हणाल्या.या महिला उमेदवार प्रचलीत राजकीय पद्धतीच्या विरोधात ठामपणे लढल्या त्याचे महत्व आगळे आहे असेही त्यांनी नमूद केले.