Priyanka Gandhi’s post । बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या एका पोस्टची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केलीय. त्यातच आता प्रियंका गांधी यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी 13 हजार एन्काऊंटरवर भाष्य केलंय.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये, “खून, हिंसाचार, रक्तपात आणि एखाद्याचा जीव हिरवण्याचा राजकीय कायदा, बुलडोझर शिक्षेचा संविधान आणि न्याय यांच्याशी काहीही संबंध नाही. राजकीय वर्चस्वाच्या कृत्यांना कायदा आणि सुव्यवस्था म्हणणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान आहे.” असे म्हटले आहे.
हत्या, हिंसा, रक्तपात और जीवन छीन लेने की राजनीति का कानून, बुलडोजर का कानून, इसका संविधान और न्याय से कोई लेना-देना नहीं है। राजनीतिक वर्चस्व और भय का साम्राज्य कायम करने की करतूतों को कानून-व्यवस्था का नाम देना संविधान का अपमान करना है।
कानून-व्यवस्था समाज में शांति स्थापित…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 23, 2024
न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला प्रत्येक जीव फक्त खूनच… Priyanka Gandhi’s post ।
प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “कायदा व सुव्यवस्थेचा पाया समाजात शांतता प्रस्थापित करणे, गुन्हेगाराला शिक्षा करून त्याच्या सुधारणेसाठी आणि प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याची संधी देणे यावर आधारित आहे. अपवाद वगळता, न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला प्रत्येक जीव फक्त खून आहे.”
“हा खेळ का खेळला जात आहे?” Priyanka Gandhi’s post ।
पुढे त्यांनी, “बातम्यामंध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सात वर्षांत यूपीमध्ये झालेल्या सुमारे 13,000 चकमकींमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे का? गुन्हे थांबत नाहीत. मग त्याचा उद्देश काय? हा खेळ का खेळला जात आहे? हे असंवैधानिक काम थांबवावं आणि ज्या सर्व चकमकींवर प्रश्नचिन्ह आणि संशय आहे, त्यांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे,” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात १३ ऑगस्ट २०२४ रोजी एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. यामध्ये सफाई कामगार अक्षय शिंदे याच्यावर दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. यातील एका मुलीने सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर परिसरातील हजारो पालकांनी रस्त्यावर उतरत आरोपीवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले होते.