प्रियांका गांधी यांचे वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे सूतोवाच

राहुल गांधींनी परवानगी दिली तर दाखवली तयारी

कल्पेटा (वायनाड) – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर आपल्याला परवानगी दिली तर वाराणसीमधून निवडणूक लढवण्यास आपल्याला आनंद होईल, असे आज त्या म्हणाल्या.

गेल्याच महिन्यात वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवायला आपली कोणतीही हरकत नाही, असे सूचक विधान प्रियांका गांधी यांनी केले होते. तेंव्हापासून प्रियांका या वाराणसीमधील कॉंग्रेसच्या उमेदवार असण्याबाबत तर्क वर्तवले जाऊ लागले होते. आज प्रियांका गांधींनी पुन्हा एकदा वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्‍त केल्यामुळे ही शक्‍यता अधिक तीव्र मानली जाऊ लागली आहे. यापूर्वी जर पक्षाने आपल्याला सांगितले तर आपण निवडणूक लढवायला तयार असल्याचेही प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

उमा भारती यांनी प्रियांका यांच्याबाबत केलेले वैयक्तिक वक्‍तव्य आज वार्ताहरांबरोबरच्या वार्तालापादरम्यान प्रियांका गांधी यांनी फेटाळून लावले. “एखाद्या चोराच्या पत्नीकडे ज्याप्रमाणे बघितले जाते, तसेच प्रियांका यांच्याकडेही बघितले जाईल.’ असे उमा भारती म्हणाल्या होत्या. आजी, अजोबा, वडील, आईपासून कुटुंबातील सर्वांबाबत एकच गोष्ट सातत्याने बोलली जात आहे. अशी वक्‍तव्ये केली जातच राहतील. मात्र आम्ही आमचे काम करतच राहू, असे प्रियांका स्मितहास्य करतच म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.