‘ये क्या बकवास है!’ साऱ्या देशाला माहितेय राहुल गांधी भारतीय आहेत – प्रियांका गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित झाल्यावर आता गृहमंत्रालयानेही आज नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. यानंतर राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांनी आक्रमक होत ये क्या बकवास है असं म्हटलं आहे.

या संपूर्ण वादावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, “संपूर्ण देश राहुल गांधी भारतीय असल्याचं जाणतो. राहुलचा जन्म भारतातला आहे. इथेच तो लहानाचा मोठा झाला आहे. त्याच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणं मूर्खपणाचं आहे.

दरम्यान, राहुलच्या नागरिकत्वावर आणि शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणारे एक पत्र भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी गृहमंत्रालयाला पाठविले होते. तसेच सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून, राहुल गांधी ब्रिटीश असल्याचा आरोप केला. यानंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठविली असून १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.