प्रियांका गांधी-वढेरा यांनी वाराणसीतून निवडणूक लढविण्याचे दिले संकेत   

नवी दिल्ली – काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.  प्रियांका गांधी-वढेरा यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आग्रही होते. यावेळी प्रियांका  गांधी म्हणाल्या, वाराणसीतून का नाही? दरम्यान, यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

प्रियंका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी रायबरेलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना रायबरेलीतून निवडणूक लढवावी असा आग्रह केला. यावर प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून का नाही? असे प्रतिप्रश्न विचारला.

दरम्यान,  प्रियांका  गांधी-वढेरा आज अयोध्येत निवडणुकीचा प्रचार करणार आहे. यावेळी त्या हनुमानगढी मंदिरात पूजा केल्यानंतर रोड शो करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.