नवी दिल्ली :– कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांचे बंधू राहुल यांच्याप्रमाणेच राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि पुत्राच्या पाठिशीही उभ्या राहिल्या. लालूपुत्र आणि कन्येच्या चौकशीचा प्रियंका यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
लालू रेल्वेमंत्री असताना नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळा घडल्याचा आरोप आहे. त्यावरून लालू आणि त्यांचे कुटूंबीय केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री असणारे लालूपुत्र तेजस्वी यादव आणि लालूंच्या कन्या मिसा भारती यांची शनिवारी स्वतंत्रपणे अनुक्रमे सीबीआय आणि ईडीने चौकशी केली. त्या पार्श्वभूमीवर, प्रियंका यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर ट्विटरवरून जोरदार टीकास्त्र सोडले.
भाजपा इस देश से विपक्ष और लोकतंत्र खत्म करना चाहती है। इसलिए लगातार विपक्ष के लोगों की आवाज पर हमला कर रही है।
बिहार के उप मुख्यमंत्री श्री @yadavtejashwi जी और मीसा भारती जी को एजेंसियों द्वारा प्रताड़ित किया जा रहा है।
लोकतंत्र पर हो रहे हमले के खिलाफ हम सब एकजुट हैं।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 25, 2023
देशातील लोकशाही आणि विरोधक संपवण्याची भाजपची इच्छा आहे. त्यामुळे सातत्याने विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत आहेत. तेजस्वी आणि मिसा यांना यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात आम्ही एकजूट आहोत, असे प्रियंका यांनी म्हटले.
Environmental Crime : पर्यावरणाशी संबंधित 1.36 लाख खटले प्रलंबित; गुन्ह्यांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ
मानहानीच्या खटल्यात शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्या घडामोडींनंतर प्रियंका भक्कमपणे राहुल यांच्या पाठिशी उभ्या राहिल्याचे दिसून येत आहे.