नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर देशातील राजकारण वेगळ्याच दिशेने जात असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रामपूरला जात आहे. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहे.
आज नवरीत सिंग यांचा दहाव्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात प्रियंका गांधी सहभागी होणार आहे.ट्रॅक्टर रॅलीनंतर पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.
Delhi: Congress leader Priyanka Gandhi is en route to Rampur, Uttar Pradesh
Visuals from the Sahibabad area pic.twitter.com/eBlKixVH45
— ANI (@ANI) February 4, 2021
ज्यामध्ये आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली दबून नवरीत सिंग यांचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालात देखील सिंग यांच्या मृत्यूचे कारण अपघात आहे.
प्रियंका गांधी दिल्लीतून निघाल्या आहे. त्यांच्यासह उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंग देखील आहे. NH-24 मार्गाने त्या उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाणार आहे. त्यांच्यासह गाड्यांचा मोठा ताफा देखील आहे.