कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून प्रियंका गांधींचा योगी सरकारवर निशाणा

लखनौ – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून सरकारवर निशाणा साधला. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून गांधी यांनी याबाबत ट्विट केलं असून गेल्या ३ दिवसांमध्ये राज्यात ५ हजार कोरोनाग्रस्तांची भर पडल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिल आहे. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशात दर ५ हजार रुग्ण वाढण्यासाठी लागलेल्या अवधीचा लेखाजोखा देखील मांडला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी, ‘गेल्या तीन दिवसातील कोरोनाची आकडेवारी 10 जुलै – 1347, 11 जुलै – 1403, 12 जुलै – 1388. लॉक डाऊनच्या विकेंड बेबी प्लॅन मागच्या लॉजिकची उकल अद्याप कोणालाच झालेली नाही. स्वतःच अपयश लपण्यासाठी छळ सुरूच आहे.’ असा टोला लगावला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार, उत्तर प्रदेशात पहिले ५ हजार रुग्ण वाढण्यासाठी ७६ दिवसांचा अवधी लागला होता. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रदेशात गेल्या तीन दिवसांमध्ये ५ हजार रुग्ण वाढले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.