प्रियंका गांधीनी मांडली विद्यार्थ्यांची बाजू म्हणाल्या,’बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात अथवा…’

नवी दिल्ली : देशभरात करोना स्फोट होताना दिसत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोना आल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठा वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

यातच मे महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी वाढत आहे. याच मुद्यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीदेखील विद्यार्थ्यांच्या बाजूनं पुढे आल्या आहेत.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी 

“या महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास भाग पाडणे हे बेजबाबदारपणाचं आहे. बोर्ड परीक्षा घेतांना मुलांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, परीक्षा घेण्याचे नियोजन नीट करायला हवे.  बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा शेड्यूल केल्या पाहिजेत.” असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीबीएसई बोर्डाला फटकारलं

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.