हरियाणा: प्रियंका गांधींनी अंबालामधील सभेत पंतप्रधान मोदींना दुर्योधनाची उपमा दिली. दुर्योधनालाही असाच अहंकार होता आणि त्यानं दुर्योधनाचं आतोनात नुकसान झालं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. हरियाणातील अंबाला येथे एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या. त्यानंतर काही मिनिटांत यावर अमित शहांचं उत्तर आलं. दुर्योधन कोण ते २३ तारखेला जनताच दाखवेल असा पलटवार शहांनी केला.
प्रियंका गांधी म्हणाल्या, अहंकारी व्यक्तीच्या पाडावाची इतिहास आपल्याला साक्ष देतो, महाभारतात जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला होता.
निवडणूक प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी आपण दिलेल्या आश्वासनांचे काय झालं हे कधीही सांगितलेलं नाही. उलट कधी शहिदांच्या नावांनी मत मागितली तर कधी माझ्या कुटुंबातील शहीद सदस्यांचा अपमान केला गेला. असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
#WATCH Priyanka Gandhi:Desh ne ahankaar ko kabhi maaf nahi kiya,aisa ahankaar Duryodhan mein bhi tha,jab Bhagwan Krishna unhe samjhane gaye to unko bhi Duryodhan ne bandhak banane ki koshish ki.Dinkar ji ki panktiyan hain,'Jab naash manuj par chaata hai,pehle vivek mar jata hai.. pic.twitter.com/lfMrgCEnHZ
— ANI (@ANI) May 7, 2019