‘या’ सहा नेत्यांना प्रियंका गांधी करते फॉलो !

नवी दिल्ली – राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, प्रियंका गांधी यांचा सोशल मीडियाच्या जगाशी संबंध नव्हता. मात्र कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय महासचिव बनल्यानंतर त्यांनी सोशल साइट्सवर प्रवेश केला. 11 फेब्रुवारीला  प्रियंका गांधी वाड्रा या नावाने त्यांचे ट्विटर अकाउंट सुरू झाले. त्यासोबतच YouTube चॅनेल देखील सुरू झाले. त्यांच्या अकाउंटवर दोन दिवसांच्या आत दोन लाखांहून अधिक 16 हजार फॉलोवर्स झाले आहेत. परंतु आतापर्यंत त्यांनी एकही ट्विट केले नाही. प्रियंका गांधींचे फॉलोवर्स त्यांच्या ट्विट्च्या प्रतिक्षेत आहेत. तसेच प्रियंका गांधी या कुठल्या विषयावर पहिले ट्विट करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एकीकडे ट्विटर अकाउंटवर दोन दिवसांमध्ये दोन लाखांहून अधिक 16 हजार फॉलोवर्स झाले मात्र प्रियंका गांधी स्वत: हा मात्र  7 ट्विटर हैंडल्स फॉलो करीत आहे.यामध्ये पक्षप्रमुख राहुल गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राज्यसभेचे खासदार अहमद पटेल, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला आणि पक्षाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×