क्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : देशात अर्थव्यवस्थेची बिघडत चाललेली घडी पाहता सरकारवर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता कॉंग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एका क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. जेव्हा क्रिकेट या खेळात कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची सच्ची भावना मनात असणे गरजेचे आहे. कॅच सुटला म्हणून गणित, गुरुत्वाकर्षण, ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असेही त्यांनी या ट्विट सोबत लिहिले आहे.

अर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्योगावर आलेल्या आर्थिक अरिष्टावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, याआधीही प्रियंका गांधी यांनी फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर आर्थिक मंदीवरुन निशाणा साधला होता. भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सरकारवर टीका केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here