प्रियंका एका इंस्टाग्राम पोस्टमधून कमावते 2 कोटी रुपये

बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत तीचा समावेश आहे. इंस्टाग्रामवरील तिचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. मात्र, प्रियंकासाठी सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म फक्त चाहते व फॉलोवर्सशी संवाद साधण्याचेच माध्यम नाही. तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटींची कमाई करण्याचेही माध्यम बनले आहे.

हॉपर एचक्‍यूने प्रसिद्ध केलेल्या यादी नुसार प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिला प्रत्येक पोस्टसाठी 2 लाख 71 हजार डॉलर म्हणजेच 1 कोटी 86 लाख 98 हजार रूपये मिळतात. ही खूप मोठी रक्कम असून, ब्रॅंडेड कंपन्यांकडून झालेल्या करारातूनही ती आणखी पैसे मिळवते.

या यादीत प्रियंका व्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील आहे. तो लिस्टमध्ये 23 व्या क्रमांकावर असून, स्पोर्टस सेक्‍शनमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 3 कोटी 61 लाख फॉलोअर्स असून त्याला एका पोस्ट साठी 1 लाख 96 हजार डॉलर म्हणजेच एक कोटी 35 लाख रूपये मिळतात. या लिस्टमध्ये अमेरिकेतील काइली कॉस्मेटिक्‍सची मालक काइली जेनर पहिल्या क्रमांकावर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)