मादाम तुसाद म्युझियममध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्राचाही पुतळा

जगभरात लंडनमधील मादाम तुसाद हे आपल्या वॅक्‍स म्यूजियमसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपला मेनाचा पुतळा असणे त्याच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. या म्यूजियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय बच्चन यांचे मेनाचे पुतळे आहेत. आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा मेनाचा पुतळा मादाम तुसाद संग्रहालयात उभारण्यात आला आहे. तसेच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.  चार संग्रहालयात जागा मिळवणारी प्रियंका चोप्रा पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे.

दरम्यान या मेनाचा पुतळा बघण्यासाठी प्रियंका चोप्राने मादात तुसाद संग्रहालयाला भेट दिली. तसेच आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.